“ट्रैक्टर माती खेळतोय”

traktar.jpg

त्याच झाल असं… काल एका शाळेच्या कार्यक्रमासाठी जात असताना प्रवासात विठ्ठल दांगडे (माझा वर्गमित्र) ची पाउने दोन वर्षाची मुलगी “श्रेया” छान-छान गप्पा मारत होती.
अचानक तिला बाहेर ट्रैक्टर दिसला आणि ती सांगायला लागली… “काका, ट्रैक्टर… काका, ट्रैक्टर…”
मग मी काय बोलायच म्हणून सहजच बोललो,
“ट्रैक्टर काय करतो?…” आणि तिने क्षणाचा विलंब न करता उत्तर दिले “माती खेळतोय….”

आई गं… किती परफेक्ट, छान आणि निरागस उत्तर…

आपल्याला कोणी विचारले असते तर ट्रैक्टरकडे पाहत, निरीक्षण करत नागरणी, पेरणी वगैरे असे काहीतरी उत्तर दिले असते पण हे पाउने दोन वर्षाच्या बुद्धिला काय माहित… तरीही तिने दिलेले उत्तर किती परफेक्ट आहे… कारण बारीक विचार केला तर ट्रैक्टर काहीही करत असला तरी शेवटी तो मातीच खेळतोय की…

मला तिचे खुप कौतुक वाटले… कसकाय तिला सूचल असेल हे…..

मला ऐकून खुप छान वाटले म्हणून तुमच्याशी शेअर करतोय… “ट्रैक्टर माती खेळतोय”☺

— अय्याज

लोकशाहीर

annabhau_sathe
संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा,
खुशाल कोंबड झाकुन धारा।

असे तत्कालीन सरकारला ठणकाउन सांगत अनेक पोवाडे, लावण्या, गीतं, छक्कडा, वग व नकला लिहित-गात एका निरक्षराने सबंध महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान पिंजुन काढला आणि मराठी देशाला जाग केल.

परिस्थिती व जातिव्यवस्था यामुळे दुरावलेल्या शिक्षणाची भूक जमेल तशी भागवत ८-९ वर्षाचे पाय तमाशाच्या गर्दीत चालू लागले. अश्याच एका गर्दीत बसून या लहानग्याने क्रान्तिसिंह नाना पाटिल यांना ऐकल आणि मनोमनी चळवळीत सहभागी झाला. क्रान्तिसिंहांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांमुळे हुसळलेल्या गर्दीतसुद्धा नाना पाटलांचा पाठलाग करत या बालक्रांतिकारकाने नाना पाटलांना डोंगरचा रस्ता दाखवला आणि पुढे जाऊन फक्त त्यांचीच नाहीतर आख्या देशाला फकीराची भेट घडवून दिली.

प्रवास इथेच संपत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी १०-१२ वर्षाचा पठ्या २२७ मैलाच अंतर पायी चालत वाटेगाव, सांगलीतुन निघुन मुंबईच्या चिरागनगरला येऊन धडकतो. कधी कोळश्याच्या खानीत तर कधी हमाल म्हणून, कधी फेरीवाला तर कधी डोरकीपर म्हणून हाताला मिळेल ते काम करत दिवस काढतो. एक गिरणीकामगार असा हलाखीचा काळ जगता-जगता कादगावरही दिसेल-जमेल तसी परिस्थिति खरडत होता. ऐरवी इतरांना मोहात पडणारी मायानगरी, प्रियसी, नायीका भासलेली मुंबई कशी कामगार-भांडवलदारांत दुभागली असल्याचे चित्र हा शाहीर शब्दांत मांडतो.

मुंबईत उंचावरी। मलबार हिल इंद्रपुरी।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती।।
परळात राहणारे। रातदिवास राबणारे।
मिळेल ते खाऊनी घाम गाळती।।

उत्तम दांडपट्टा फिरवणाऱ्या या खेळाडुने मैदानावर अनेक खेळाडूंना तर पछाडलेच पण राजकारणाच्या मैदानावर देखील मोरारजी देसाई, सखापाटला सारखे दिग्गज पलटवारात हाणून पाडले. त्या काळात तमाशामधुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जनजागृती होत असल्याने मोरारजी देसाईने तमाशावर बंदी आणली होती तेव्हा याच मातब्बर राजकारण्याने तमाशाला लोकनाट्याच रूप देऊन अजरामर केल आणि जनजागरण अविरत सुरु ठेवले म्हणूनच आपण आजही तमाशाला लोकनाट्य तमाशा असेच संबोधतो.

माझी मैना गावावर राहिली,
माझ्या जीवाची होतीया कायली।

एकीकडे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच अजरामर प्रेरणागीत लिहिणारे शाहीर दुसरीकडे डॉ. बाबासाहेबांची शिकवण काव्यात मांडत दलित चळवळ देखील उभी करतात.

जग बदल घालुनी घाव,
सांगून गेले मला भीमराव।

फकीरा, मास्तर, माकडीचा माळ, भुताचा माळ, गुलाम, वारनेचा वाघ अश्या ४५ कादंबऱ्या, १५० कथा, ३ नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपट कथा आणि अनेक लावण्या-पोवाडे लिहिणाऱ्या या दीड दिवस शाळेत गेलेल्या लेखाकाचे साहित्य १ वा २ नव्हेतर तब्बल २७ भाषेत भाषांतर झाले आहे. असा हा साहित्यसम्राट पण यांच अक्षर त्यांचे सहकारी वामनराव भट सोडता कोणालाही वाचता येत नव्हते. वामनराव यांनीच त्याचं साहित्य पुन्हा लिहून प्रकाशित केल.

ज्याला उभ्या आयुष्यात ‘स्त्री’ हा शब्द कधीच लिहिता आला नाही पण स्त्रीजीवन चित्रा, वैजयंता यांसारख्या लेखनातून जिवंत करणारा हा अवलिया होता.

अश्या साहित्यसम्राटाने पहिल्या दलित साहित्य संमेलनाच अध्यक्षीय स्थान भूषवल व भाषण करताना एक कणखर कामगार नेता असल्याचेही सिद्ध करत कडाडला व मान्यतांच्या कुशीला कलाटणी देत कामगाराला अतिउच्च स्थान प्रदान करत म्हणाला,

ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसुन,
कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे.

राशियाच्या पंतप्रधानांना ज्यांचा गौरव करावा वाटला, ज्यांनी राशियात जाऊन शिवचरित्र सांगितले असे साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन।

त्यांचा आदर म्हणून कुठलाही बाँडबाजा-डीजे लाऊन गोंधळ न घालता वाचन लेखानातून त्याच्या साहित्य शिकवणीचा प्रचार-प्रसार हीच त्यांना श्रद्धांजलि असेल.

— अय्याज

यही दिल है….

ये दिल है…
ये दिल है जो समझता है, समझाता है,
रूठता है, मनाता है।

दिल टूटता है तो जवाब मांगता है रबसे, उसके टूटने का,
और जब कभी रूठता है तो इंतज़ार करता है, किसीके मनाने का।

बरसाता है दुआऐ खुशीके पल अपनानेके लिए,
और खैरात भी बहाताहै गमोको भुलानेके लिए।

कभी कुछ समेटता है,
 कुछ बिखेरता है,
कुछ खोता है,
कुछ खोजता है,
कुछ करता है जाहिर,
कुछ छुपाताभी है
और कभी करता है अफसोस,
कुछ होने – ना होने पर,
कुछ करने – ना करने पर
और फिर तड़पता है मिटाने तड़प की आग,
 जो लागि है दिल के भीतर,
जलाता है उस आग को, जलकर बुझने के लिए।

ये दिल है…
ये दिल है हमराही जिंदगी का….
ये दिल है दोस्त हर सदी का….
ये दिल है रास्ता उस मंजिल का,
जो मक़सद तय नहीं करता पर सुकुन तो वही आता है….

ये दिल है…
ये दिल है….
यही दिल है….

                                              —- अय्याज

म्हणूनच कदाचित ‘लहानपण देगा देवा’……

grandparents

‘वय’ या शब्दाचा अर्थ आपल्याला ‘उमर वा ‘age’ असा माहित आहे पण ग्रामीण भागात या शब्दाचा अर्थ ‘वळणे’ असाही घेतला जातो. शेतकरी या शब्दाचा वापर गुरांना वळवण्यासाठी हमखास करतात. हि उकल करण्याचा उद्देश आसा कि जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपल्या शारीरिक बदलाबरोबरच आपली भाषा, विचार, वागणूक, ज्ञान, सवय, मन, निश्चय, आवड, निवड, मित्र, राहणीमान आणि कितीतरी गोष्टी बदलत जातात, वळली जातात, वळवली जातात.

आपल्या जीवनाचे प्रामुख्याने पाच टप्पे मानले जातात. बालपण, किशोरवयीन , तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य. यात बालपण म्हणजे निरागसता आणि वार्धक्य म्हणजे अनुभव हि सांगड होते आणि बाकी टप्पे या दोघांमधील विविध वळणे म्हटले तरी चालेल. काही लोक असेही म्हणतात कि रोजचा काहीवेळ जर लहान मुलांत आणि वयोरुद्धांत घातला तर दिवस चांगला जातो म्हणून. अगदी याच वाक्यात आपला विषय दडला आहे. बालपणात आपल्या अगदी मोजक्या गरजा असतात आणि दुनियादारीची चाहूल लागलेली नसते म्हणून आपण अगदी आनंदात, निरागसपणे हवेतसे खेळत-बोलत बागडत असतो, जगत असतो, जगाची चिंता न करता. मग किशोरवय ते प्रौढत्व हा प्रवास ‘बालपण म्हणजे पोरखेळ’ असे समजून स्वार्थ, गरजा, आवडी-निवडी, सुख-दु:ख, माझे-तुझे करण्यात कधी निघून जातो कळतच नाही. आणि मग येते ते वार्धक्य, जीवन प्रवासाचा अनुभव एकवटून आलेले. पण या वयात ना तर कोणी आयुष्यभर केलेल्या कष्टाची दाद देणारा असतो ना साथ. भलेभलेतर त्यांचे विचारही कोणी विचारात घेत नाही. म्हणूनच कि काय या वयात बालपणानंतरचे आयुष्य म्हणजे वाया घातलेले क्षण असे वाटायला सुरवात होते आणि बालपणासारखे जगण्याची इच्छा मनी जन्म घेते. बालपणाच्या साऱ्या सवयी पुन्हा एकदा नव्याने उभरतात. मित्रांची ओढ निर्माण होते. आयुष्य पुन्हा एकदा बालपणाच्या वळणावर येउन ठेपते. पण या वेळेला बालपणातील मनाचा हलकेपणा मात्र हरवलेला असतो, संगती असते ते भले मोठे ओझे, आयुष्यभर वाहून आणलेले. कदाचित हे ओझे इतके अवजड असावे कि हरवलेले लहानपण यात सापडत नाही मात्र शोधण्याचा प्रयत्न ,मात्र नक्कीच केला जातो.म्हणूनच कदाचित भल्या साऱ्या आजी-आजोबांची लहानग्यांबरोबर गट्टी जमते आणि म्हणूनच कदाचित त्या लहानग्यांबरोबर खेळता-खेळता ‘लहानपण देगा देवा…’ अशी इच्छाही देवाकडे अर्जीली जाते…….

– अय्याज

एका सत्य संवाद – काय बोलला शेतकरी?

एका सत्य संवाद – काय बोलला शेतकरी?

माझी जेव्हा कधी गावी चक्कर होते तेव्हा प्रवासात मला काही गोष्टींची सवय लागून गेली. त्यात मग एखाद्या प्रवाश्याला लिफ्ट देऊन त्याच्या दैनंदिनीची चौकशी करणे असेल , प्रवास मार्गावरील नवीन उद्योगांना जाऊन भेट देऊन त्याची माहिती घेणे असेल किंवा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी हितगुज असेल. या सर्वांमागाचा उद्देश फक्त माझ्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे मिळून देणे एवढाच. प्रत्येक प्रवासाअंती मला काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टींचे अनुभव आले आणि बर्याचदा चर्चेचा शेवट राजकारणाशी येउन थांबला, विलाज खुंटल्या सारखा.

आजचा संवाद आहे अहमदनगर जील्ह्यातील श्रीगोंदा-पारनेर तालुक्यांच्या सीमेवरील १५०० लोकसंख्या असलेल्या गावातील काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा.

८-१० फुट रुंद रस्त्त्याच्या मधोमध एक साठी पूर्ण केलेली सायकल, सर्वबाजूने गंज लागून चढलेला लाल-पिवळा रंग, ऑपरेशन करून टाके दिल्याप्रमाणे ठिकठीकाणी वेल्डिंगच्या खुणा, समोर दोन व पाठीमागे चार दुधाच्या अडकवलेल्या किटल्या आणि मधोमध जनावरांसाठी मकेची भली मोठी पेंढी. त्या पेंढीने पूर्ण रस्ता व्यापून घेतल्याने मला नाइलाजास्तव तेथे थांबावे लागले आणि मनातल्या मनात सायकल लावणाऱ्याचा उद्धारहि झाला. तेथून काही अंतरावरून एक साठीतले गृहस्थ चालत येत होते. धाडीचे वाढलेले पांढरे खुंट, डोक्याला गुंधाळलेली जुनी मफलर, अनेक थिगल्यांची मळकटलेली कोपरी, हातात एक मकेच चिपाड आणि जुनी चामड्याची विमानटायर चप्पल घातलेले पाय झपाझप पुढे येत होते. अवतारावरून सायकल त्यांचीच असावी असे वाटले आणि आजूबाजूला इतर कोणी नसल्याने खात्रीही पटली. मी रागाच्या भारात काही बोलणार तर त्यांनीच सुरुवात केली . “जरा चिपाड पडलं व्हत, आणायला गेलतो… इकातच हाय ना… काय करता? ” असे बोलून चर्चेला सुरवात केली.

त्यांचे शब्द ऐकल्याबरोबर मनातल्या रागाची जागा अनेक प्रश्नांनी घेतली आणि एक एक करून विचारपूस व प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला, अनेक वर्षांची ओळख असल्यासारखी.

विकत चा चारा? का बर? जमीन नाही का तुम्हाला?
“हाय ना, पर समदी पडीक पडलिया, २ वरीस झालं चांगला पाउस नाही. वरल्या रामान तळयातून पाइपलाइन केली, त्याच्याकडूनच घेतली इकात.”

मग तुम्ही का नाही केली पाइपलाइन?
“खायाची वांधे, पाइपलाइन कुठून व्हायची? त्यात तळ्यात बी पाणी नाही सुटत वापरायला. आधीच पोरीच्या लग्नाचं कर्ज हाय डोक्यावर त्यात पिक नाही, काम-धंदा नाही. दुष्काळात कर्ज फेडायला दुसरा रस्ता नाही म्हणून डेरीवाल्याकडून उच्चल घेतली न घरच्या दोन अन अजून दोन अश्या चार गाया केल्या दुध धंद्यासाठी पण कसल काय चारी बाजून मारानच. ”

का बर मरण? गायी दुध नाही देत का?
“देत्यात कि, हे बघा दोन्ही ताइमाच ६५ लिटर घालून आलो आत्ताच डेरीला तरी घरची एक जरा कमी पडली, गाभण हाय ना. पण हे सरकार कुठ जगून देतंय गरिबाला? आच्छे दिन म्हणून लुटलं आम्हाला न कसलं काय”

का बर?
“हे बघा दुष्काळ म्हणून काही काम नाही का धंदा नाही, जमीन पडीक. पिकापान्याची कर्ज डोक्यावर, जगायचं कस म्हणून माझ्या सारख्या लई शेतकर्यांनी जमवलेला पैसा घालून, कर्ज घेऊन दुध धंदा वाढवला. बर आधी आधी भाव बी व्हता. २६ रुपय मिळायचं लिटर ला पाणी घातल्याल नसल तर. मग इकतचा चारा, इकातचा खुराक, जनावरांची दुखणी-बहाणी जाउन उरायच थोडफार. पण आता सरकारनि दूधाच भाव केल्यात कमी, आता १५ नाहीतर १६ रुपय मिळत्यात लिटरला. एकदम १० रुपायाचा फटका. म्हणजी तुमच पाणी आता महाग मिळतंय १७ रुपायला बाटली अन दुध १५. सांगा कस जगायचं? बर सरकारणी खुराकाच भाव कमी नाही केल तवा खर्च हाय त्योच आन दुधाचा पगार कमी. म्हणून आता गाई धंदा परवडणा, समदा लॉस मंदी चाललाय, खिशातून भरतोय वरची पैस, इलाज नाही.”

खिशातून कशाला भरता? त्यापेक्षा विकून टाका न फिरवा कर्ज माघारी.
“ते बी करून पाहिलं बाबा. आता ह्या गायी ९० हाजाराला एक आशा दोन घेतल्या पण दूधाच भाव पडल्यान बाजारात कुणी कुत्रं इचारीना जनावराला अन जे माघतेत ते पार भाव पाडून. माझी ही ९० वाली ६० ला माघितली. कशीकाय द्यायची सांगा, आणल्या माघारी पदरच भाड भरून. पार वाटूळ झालं. एका गाईला गोऱ्हा झाल्याला, ते काय आमच्या कामाच हाय का? कसाईला वासरू इकाव तर त्याच्यावर बी बंदी आणली सरकारणी. कसाई गावात यायचं बंद झालं, आता काय त्याला चारा चुकणार हाय का पाणी? अन त्याला मारून बी टाकता येत नाही. आमची तर आक्कल चालना. मुसक्या घालून बुक्याचा मार देताय सरकार गरिबाला. माल पिकवायचा आम्ही आणि व्यापार्याला मोठ करायचं बाकी काय? आजून एक सांगतो तुम्हाला, परवा पाहून आल व्हती पुण्याहून, शेजारच्याच गावची हायेत, पुण्यात रिक्षा चालावतेत. ते म्हणाले आम्हाला दूधाच पाकीट घ्याव लागत म्हणून. ४० रुपयाला लिटर अन तेबी पाण्यागत दुध. हाय का नाही लुबाडायचा धंदा. आमच शेतकऱ्याच पिवर दुध १५ रुपय, न तिकड शिटीत गरीबांला पाणी घालून ४० रुपये. सगळी मलई व्यापाऱ्याच्या घाशात. मग का नाही घेणार शेतकरी फाशी? आपल्या इकड नाही मेल कुणी आजून पण मरत्यान आसच चाल्यावर. तिकड विदर्भात का मराठवाड्यात रोज लोक फाश्या घेत्यात. काय करत्यान बिचारी. दुष्काळ मदत २१ रुपयाचा चेक आलता मागच्या येळेस, या येळला त्योबी नाही. ”

“चला जितराब वाट बघत आसत्यान चाऱ्यासाठी. जाव लागण. चला चहा प्यायला, जवळच हाय घर.”

त्याची करून कहाणी ऐकल्यावर त्याने केलेला चहाचा आग्रह हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. ज्याचे जगायचे वांधे तो चहा साठी येवढा आग्रह कसा धरू शकतो आणि तो हि अनोळखी माणसाला. मी त्या शेतकऱ्याला कसातरी ‘नाही’ म्हणून पुढच्या प्रवासाला निघालो मात्र त्या गृहस्थाचा सतेज चेहरा बाकी माझ्या डोळ्यासमोरून जाईना.

मात्र आज मला एक नवीन गोष्टीची समज आली होती, जे वर्षानुवर्षे या भारत देशाला जगवत आलेत, ज्यांनी सर्व भारतीयांना अन्नाचा तुकडा मिळावा म्हणून काबाड कष्ट केले, तो सगळ्यांचा पोशिंदा मात्र तसाच वर्षानुवर्षे वंचित आहे. केंद्रात, राज्यात जाहीर झालेली एकही योजना त्याच्यापर्यंत सुखरूप पोहचत नाही आणि त्यांच्या विरुद्ध बंड करण्याइतपतची हिम्मत त्याचे पोट त्याला करू देत नाही. आपल्या देशाचे प्रधानमंत्री जगभरातील देशांमध्ये पोहचले मात्र त्यांना देशातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचता आले नाही हि खंत. सुरुवातीच्या काळात मोदींची ‘मन कि बात’ हि सर्वांसाठी प्रेरणादायी आशेचा किरण असताना सेवा कारमधील वाढ, पेट्रोल दर वाढ, दुधाचे गडगडलेले भाव, जमीन अधिग्रहण आणि असे बरेच बदल तसेच कालेधन व भ्रष्ट कारभारावरील खोट्या आश्वासणामुळे चिडचिड करायला लावणारी आणि अस्वस्थ करणारी बात वाटायला लागली आहे.

हा सगळा शेतकरी, कामगारवर्ग व सर्वसामान्यांवरील अन्याय पाहता, चाललेला विकास हा सर्वसमावेशक विकास वाटत नाही आणि एखादा विकास जर समाजातील सर्व घटकांना घेऊन झालेला नसेल तर तो विकास नसून फक्त एक बदल आहे, काही ठराविक गटाला लक्षात ठेऊन केलेला. मोदी सरकारला प्रत्येक स्थरातील लोकांनी भरभरून मतदान केले आणि आता विकास नक्की अशी भाबडी आशाही धरली. गेलेल्या एक वर्षात जरी सरकारचे निराशजनक काम झाले असले तरी लोकांच्या मनात अजूनही सर्वसमावेशक विकासाची आशा आहे आणि त्या आशेला सरकारने खरे उतरावे एवढीच मनोमन सदिच्छा.

सय्यद अय्याज
ayyaj.sayyad1249@gmail.com

वक्त

यकीन है इसपर और यकीन है उसपर,
कोई कहे ये अकबर, तो कोई कहे ओ अकबर
उल्झनोमे फसगये के कल था बहेतर या कल होगा बहेतर?
धुंधलीसी मंजिल, सुमसान सी राह और अनजान है रहेबर
बेताब न हो ये मेरे हमसफर, ये वक्त दिखाये आदिल शहर। — अय्याज

“आओ हम सब लेले प्रण….”

[अन्याय और अमानुषता बढती जा रही है। कभी छल होता है तो कभी कपट, कभी बिना वजह खून-खराबा तो कभी डकेत… और कभी कोई रीस्तेदार या पितासे, शिक्षक या किसी और से किसी अनजान, फुलसी मासूम जान पर बलात्कार….. क्या हमे ऐसेही चूप बैठना चाहिये?? ]

क्या घोर अराजक काल है, विपरीत ये कैसा प्रहार है?
मानवता शेष कीन राहोपर, कोई घाट बचा निष्पाप है?

वो अतिथी देवो समान है , पूज्य गुरुजन महान है,
माता-पिता है सर्वोपरी, ये शेष इतिहास मे गुणगान है।

अपने-पणकि कोई चाह नही, पाप-निष्पाप बची दो राह नही,
अब करे यकीन किन बाहोंपर,  जब नजर पिताकी साफ नही?

अनाज है या है जहर? ये प्यार या वासना-कहर?
‘शिक्षा’ का मतलब क्या लिए? ‘ज्ञान’ लिए या ‘दंड’ लिए?

क्या सिख ले, संस्कार ले? क्या फेक दे, क्या त्याग दे?
कोई बचा है वो मसिहा, जिससे ये सब पाठ ले?

या खुदा क्या तू अब बहेक गया? पापीको-सजा ये बदल गया?
क्या नन्ही जान का अपराध है? देदी सजा पर क्या पाप है?

आओ हम सब लेले प्रण, साथ निश्चय और कफ़न,
ना उच-निच ना जात-पात, मानवता ही बस एक नाद।
अन्याय-अमानुष बाहोको, चीर देंगे एक साथ।
सजग रहेंगे हम सदा, निष्पाप रहेंगे अंततक।
अन्याय-अमानुष बाहोको, चीर देंगे एक साथ।
अरे आये चाहे कोई आच, आये कोईभी कठीन।
अन्याय-अमानुष बाहोको, चीर देंगे एक साथ।
अन्याय-अमानुष बाहोको, चीर देंगे एक साथ।

                                                 …………. अय्याज